नाराज फडणवीस आता हे पद सांभाळणार, भाजपात आलं चर्चांणा उधाण

devendra

मुंबई – सत्तास्थापनेचा पेच सुटत नसल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाला आणि त्यामुळेच निवडणुकीपूर्वीची युती निकाल लागल्यानंतर तुटली. मुख्यमंत्री पदाची शिवसेनेची मागणी मान्य न करता विरोधी पक्षात बसण्याची भुमिका भाजपने घेतल्याचे दिसत आहे. त्याआघी 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपला असून यादिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

devendra

देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला. त्यानंतर राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना कारभार पाहण्यास सांगितले. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्रीपदही फडणवीस यांच्याकडे राहिले नाही. त्यामुळे त्यांनी आपले सोशल मीडियावरचे अकाऊंटही रिनेम केले आहे. ट्विटवरचे CM Devendra Fadnavis हे अकाऊंट रिनेम करत आता फक्त Devendra Fadnavis असे केले आहे. तसेच ‘महाराष्ट्र सेवक’ म्हणून त्यांनी स्वत:ला संबोधित केले आहे. ट्विटरचे कव्हर पेजही बदलून त्यांनी ‘धन्यवाद महाराष्ट्र’ असे म्हणत राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील राजकीय पक्ष व नेते –

नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, पंकजा मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर, गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *