शिवसेनेत माजली खळबळ! आज मुंबईच्या महापौराबाबत मोठा निर्णय

Image result for uddhav thackeray

मुंबई – मुंबईसह राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे आज स्पष्ट होणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्यावतीने आरक्षणाची लॉटरी आज(बुधवार) काढली जाणार आहे. लॉटरीमध्ये अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती पुरुष की ओबीसी पुरुष याची लॉटरी निघणार आहे. याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने या लॉटरीची माहिती राज्यपाल, निवडणूक विभाग तसेच राज्याचा विधी व न्याय विभाग यांना माहिती देऊनच ही लॉटरी काढावी लागणार आहे.

१९९७- ९८ पर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचा कालावधी एक वर्षाचा होता. १९९८ – ९९ मध्ये राज्यात महापौर परिषद स्थापन करण्यात आली. एकाच वर्षात महापौर परिषद रद्द करून महापौर पदासाठी अडीच वर्षाचा कालावधी करण्यात आला. मुंबईचे महापौरपद १९९९ मध्ये ओबीसींसाठी, २००२ मध्ये अनुसूचित जातीसाठी, २००५ मध्ये खुल्या प्रवर्गासाठी, २००७ मध्ये ओबीसी महिलेसाठी, २००९ मध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी, २०१२ मध्ये खुल्या प्रवर्गासाठी, २०१४ मध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी २०१७ मध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबईत अनुसूचित जमतीमधील नागरिकांची संख्या कमी असल्याने त्यांचे दोनच नगरसेवक महापालिकेत आहेत. याकारणाने गेल्या २० वर्षात अनुसूचित जमातीला एकदाही महापौर पद भूषवता आलेले नाही. यामुळे अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती किंवा ओबीसी आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचे निकाल लागून १७ ते १८ दिवस झाले तरी कोणत्याच राजकीय पक्षाने सत्ता स्थापन केलेली नाही. यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. राष्ट्रपती राजवट लागू असताना महापौर पदासाठी आरक्षणाची लॉटरी काढताना नगर विकास विभागाने याची माहिती राज्यपाल, निवडणूक विभाग तसेच विधी व न्याय विभागाला द्यावी लागणार आहे. बहुतेक करून राज्यपाल या लॉटरीला नाही बोलणार नाहीत. मात्र, राज्यपाल नाही बोलले तर २७ महापालिकेतील महापौरांना तीन किंवा सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी लागणार आहे.

Image result for uddhav thackeray

महाराष्ट्र राज्यातील राजकीय पक्ष व नेते –

नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, पंकजा मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर, गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *