महापौर मुक्‍ता टिळक आमदार झाल्यामुळे कोण होणार पुण्याची महापौर?

Related image

पुण्यासह राज्यातील विविध महापालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत या महिना अखेरपर्यंत होणार आहे. राज्यातील विविध महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची माहिती राज्य सरकारने मागविली आहे. पुणे महापालिकेसह राज्यातील 26 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निघणार असल्याचे राज्य सरकारमधील वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी मंगळवारी स्पष्ट केले. पुण्यासाठी विशेष मागासवर्गीय गट (ओबीसी ओपन) का अनुसूचित जाती-जमाती गट (एससी) यापैकी कशाचे आरक्षण निघेल, याबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे.

Image result for Pune municipal Corporation

महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाल 14 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात येत असलेल्या महापालिकांच्या आयुक्‍तांनी नगरविकास खात्याकडे नवीन आरक्षण सोडत काढण्यासंदर्भात माहिती पुण्यासह 27 महापालिकांना मागितले आहे. त्यानुसार महापालिकेने 2001 पासूनचा आरक्षणाचा सविस्तर तपशील राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे बुधवारी (दि.7) पाठविला आहे.

Related image

पुण्याच्या महापौर मुक्‍ता टिळक यांची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत असल्याने गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने शहरात निर्विवाद बहुमत मिळविले. पुण्यातील महापालिकेच्या सध्याच्या कार्यकाळात महापौर मुक्ता टिळक यांची महापौरपदाची मुदत 15 सप्टेंबर रोजी संपली होती. परंतु, विधानसभा निवडणुकांमुळे राज्य सरकारने ही मुदत तीन महिन्यांनी वाढविली आहे. ही मुदत 15 डिसेंबर रोजी पूर्ण होईल. तत्पूर्वी 5 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी, माघारीची मुदत ही प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यानंतर 15 डिसेंबरदरम्यान महापौरपदाची निवडणूक घ्यावी लागणार आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *