पुण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस; या भागात घरात शिरलं पावसाचं पाणी

पुणे – शहराला परतीच्या पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. पुणे शहर आणि परिसरात पुन्हा एकदा झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले तर अनेक घरात पाणी शिरले याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. त्यात येथील काञज परिसरातील नवीन वसाहत येथील ओढा भरून वाहू लागला आहे.

Image result for maharashtra rain

मध्यरात्री बारा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली त्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे शहरात असणारे ओढे-नाले भरून वाहू लागले तर शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. अनेक भागातील रस्त्यांवरही पाणी साचले आहे. रात्री झालेल्या या मुसळधार पावसामुळे पुणेकरांना पुन्हा एकदा ढगफुटीसदृश्य पावसाची आठवण झाली.

Image result for maharashtra rain

कात्रज परिसरातील नवीन वसाहत येथील ओढा भरून वाहू लागला असून त्याचे पाणी नवीन वसाहतीतील अनेक घरात शिरले आहे. शहरातील येरवड्यातील शांतीनगर वसाहत, घोरपडी गाव, वानवडीतील आझादनगर , बी.टी.कवडे रोड, पद्मावती, मार्केटयार्ड येथील अनेक घरांमध्येही पाणी शिरले आहे. तर या भागांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. तसेच लोहगाव येथील जकात नाक्याजवळ एक खाजगी कंपनीची बस पाण्यात अडकून पडली होती. या बसमध्ये 20 कर्मचारी अडकून पडले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने या सर्वांना सुखरूप बाहेर काढले.

Image result for maharashtra rain

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *