अमित शहांची पहिली प्रचारसभा पवारांसाठी, मुख्यमंत्र्यांची मोठी खेळी

Image result for amit shah

विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.  मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना लातूरच्या औसा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीला शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. “आम्हाला मुख्यमंत्र्यांचा पीए नको भूमिपुत्र द्या,” अशी मागणी या नेत्यांची आहे. आता लवकरच नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. बीडमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याला भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. शहा विधानसभा निवडणुकीसाठी पहिली प्रचारसभा लातूरमधील औसा मतदारसंघात घेणार आहेत.

Image result for abhimanyu pawar

शिवसेनेच्या दिनकर माने यांनी दोनवेळा औशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानंतर गेल्यावेळी काँग्रेसच्या बसवराज पाटील यांनी ही जागा खेचून आणली. यावेळी पुन्हा उमेदवारी मिळेल अशी शिवसेना नेत्यांची अपेक्षा होती, पण मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू पवार यांच्यासाठी ही जागा शिवसेनेकडून सोडवून घेतली. संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्यात सुप्त संघर्ष आहे. औसामधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अभिमन्यू पवार यांच्याविरोधात उभारलेल्या बंडाला संभाजी पाटील निलंगेकर यांची फूस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एका अर्थाने संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आव्हान दिल्याचं म्हटलं जात आहे.

Image result for abhimanyu pawar

औसा मतदारसंघात भाजपाकडून अभिमन्यू पवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्र्यांचे पीए/ओएसडी असलेल्या पवार यांच्यासाठी शहा राज्यातील पहिली प्रचारसभा घेतील. औसात अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. गेल्या आठवड्यात या नाराजीचं जाहीर दर्शन घडलं. बुधवारी (२ ऑक्टोबरला) भाजपाचे कार्यकर्ते लातूर-औसा रस्त्यावर आले होते. याच मार्गावरून निलंग्याकडे निघालेले पालकमंत्री संभाजी पाटील यांची गाडी त्यांनी अडवली. आम्हाला मुख्यमंत्र्यांचे पीए नको, तर भूमिपुत्राला उमेदवारी द्या, अशी मागणी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *