मध्यरात्री पत्नीने त्याला दिला नकार.. CRPF जवानाने केलं भयंकर कृत्य

Related image

नागपूर – मध्यरात्री संभोग करण्यास नकार दिला. यामुळे रागाला गेलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील (CRPF) 45 वर्षीय जवानाने 35 वर्षाच्या पत्नीच्या डोक्यावर बॅटने जोरदार प्रहार केला. या घटनेत महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शांतीनगरमधील प्रेमनगर भागात मंगळवारी (10 सप्टेंबर) मध्यरात्री घडली.

मध्यरात्री संभोग करण्यास पत्नीने दिला नकार.. CRPF च्या जवानाने डोक्यात घातली बॅट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जवान CRPFमध्ये जम्मू-काश्मीर येथे तैनात आहे. तीन दिवसांपूर्वी तो घरी आला आहे. मंगळवारी रात्री जवान व त्याच्या पत्नीने सोबत जेवण केले. त्यानंतर दोघे झोपण्यासाठी बेडरुममध्ये गेले. जवानाने पत्नीकडे शरीरसंबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यावरून संतापलेल्या जवानाने पत्नीच्या डोक्यात बॅट घातली. मात्र, तिने वेळीच पतीला प्रतिकार केल्याने पत्नीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

Image result for family harassment
यानंतर, महिलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तहसील पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून हे प्रकरण शांतीनगर पोलिसांकडे वर्ग केले आहे. शांतीनगर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related image

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *