राष्ट्रवादीला मोठा धक्का..! भास्कर जाधवांनी शिवसेना प्रवेशाची जाहीर केली तारीख

Image result for bhaskar jadhav

रत्नागिरी – गेले अनेक दिवस संभाव्य शिवसेना प्रवेशामुळे चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव अखेर शिवबंधन हाती घेणार आहे. येत्या 13 सप्टेंबर रोजी ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज (सोमवारी) प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चिपळूणमध्ये त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

आपल्यासोबत 9 जिल्हा परिषद सदस्य, गुहागर पंचायत समिती तसेच आपल्या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, आणि सरपंच आपल्या सोबत प्रेवेश करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणात राष्ट्रवादीला सर्वात मोठा फटका बसणार आहे.

Image result for bhaskar jadhav

आपल्यासोबत 9 जिल्हा परिषद सदस्य, गुहागर पंचायत समिती तसेच आपल्या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, आणि सरपंच आपल्या सोबत प्रेवेश करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणात राष्ट्रवादीला सर्वात मोठा फटका बसणार आहे.

Related image

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *