RED Alert! राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Image result for mumbai flood

मुंबई – कोकणसह मुंबई भागात बुधवारी सकाळीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी जोरदार पावसाचा इशारा दिला होता. आता, येत्या 24 तासांत राज्याच्या 5 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे.

RED Alert! राज्याच्या या 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मुंबई वेधशाळेने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असं सांगितलं आहे. मुंबईत आणि ठाण्यात पुढच्या 24 तासांत अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अतिवृष्टी होत आहे.

पुढील दोन ते तीन दिवस मान्सून राज्यभरात सक्रिय राहील. गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाने weather updates कडे लक्ष ठेवावं, असंही म्हटलं आहे. सोमवारी (2 सप्टेंबर) रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं सखल भागांत पाणी साचलं होतं. हिंदमाता, सायन, अॅन्टॉप हिल, वांद्रे, टिळकनगर, मिलन सबवे येथील सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं. बुधवारी सकाळी पावसाने कहर केला. ऐन गणेशोत्सवात मुसळधार पावसाच्या हजेरीने उत्साहावर पाणी फिरलं आहे.

मुंबईत शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. बुधवारी मुंबईच्या उपनगरी गाड्यांची वाहतूक सकाळपासूनच विस्कळीत झाली. त्यात दुपारी साडेअकरापासून मध्य रेल्वे ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत रस्त्यांवरही प्रचंड पाणी साठल्याने वाहतूक मंदावली आहे. ऑफिसमध्ये गेलेल्या चाकरमान्यांचं घरी पोहोचणं त्यामुळे अवघड होऊ शकतं.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *