गुजरातच्या हरामी नाल्यातून पाकिस्तानी सैन्य घुसखोरीच्या तयारीत!

Image result for Indian Army crawling

भारतीय नौदलाने गुजरातच्या सर्व बंदरांच्या सुरक्षेबाबत अलर्ट जारी केला आहे. तसेच तटरक्षक दलांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे. नौदलला शंका आहे की कच्छ रणमध्ये सरक्रीकच्या हरामी नाल्यामधून पाकिस्तानी कमांडो आत येऊ शकतात. नौदल प्रमुखांनी आपल्या अलर्टमध्ये सांगितले की पाकिस्तान कमांडो कच्छमध्ये घुसखोरी करु शकतात.

Related image
यामुळे तटरक्षक दलाला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याआधी देखील नौदलच्या सर्व युद्ध नौकांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले होते.पाच दिवसांपूर्वी सीमा सुरक्षा दलाने गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात भारत पाक सीमेजवळ हरामी नाला सरक्रीक क्षेत्रामध्ये पाकिस्तानच्या मासेमारी करणाऱ्या पकडणाऱ्या दोन रिकाम्या नौका ताब्यात घेतल्या होत्या.

Image result for Indian Army crawling
यानंतर बीएफएसकडून शोध मोहिम देखील राबवण्यात आली होती. भारत पाक सीमेजवळच कच्छच्या सरक्रीकमध्ये हरामी नाला आहे. येथे लोकांना पूर्णता प्रतिबंध आहे. या क्षेत्रात ८ किमी क्षेत्रात धोकादायक दलदल आहे. ही दलदल जवळपास ५०० चौरस फूट किमी पसरली आहे. मागील काही वर्षापासून पाकिस्तानी मच्छीमार ही जलसीमा उल्लंघन करण्याच्या घटना घडल्या आहेत. याच सीमा क्षेत्रात एक कृत्रिम भूयार पाहायला मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत.

Related image

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *