तुम्ही कलीगच्या प्रेमात आहात, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्ठी

Related image

सर्वात नाजूक आणि सर्वात प्रेमळ नात प्रेमाचं आहे. प्रेम केव्हा, कुठे, कोणाशी आणि कसे जुळेल यावर आजपर्यंत मोठ-मोठ्या चर्चा झाल्या, परंतु याचे नेमकं उत्तर अजूनही मिळालेले नाही. असे म्हणतात की प्रेम सांगून होत नाही आणि तुम्ही कोणावरही ठरवून प्रेम करू शकत नाहीत. आता ऑफिस ही एक अशी जागा आहे, ज्याठिकाणी एक विचाराचे काम करणारे लोक असतात. ऑफिसमधील एखाद्या कलीगसोबत तुमची मैत्री झाली आणि मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले तर यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. हे सांगण्यामागचे कारण म्हणजे, तुम्ही ऑफिसमध्येही एखाद्याच्या प्रेमात पडू शकता.

Related image
१) पाहून स्माईल देणे- तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे तणावात असाल आणि तरीही आवडती व्यक्ती समोरून आल्यानंतर तुम्ही स्माईल करता म्हणजेच तुम्ही प्रेमात पडल्याचा संकेत आहे.
२) नेहमी संपर्कात राहणे- जर तुम्ही नेहमी आपल्या कलीगच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करू लागलात तर समजून घ्या तुम्ही प्रेमात आहात. ऑफिसपर्यंत ठीक आहे, परंतु ऑफिसनंतरही त्यांची माहिती ठेवणे हा शुभ संकेत नाही.

Image result for couple pic
३) छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे- जेव्हा सहकर्मीच्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात राहायला लागल्या तर असे समजू नये की तुमची स्मरणशक्ती खूप चांगली आहे, या उलट तुम्ही प्रेमात पडल्याचा हा एक संकेत समजावा. ही दिसायला छोटी पण प्रेमात पडल्याची मोठी निशाणी आहे.
४) वेळी-अवेळी फोन करणे – जर एक दिवस कलीग ऑफिसमध्ये आला किंवा आली नाही आणि तुम्ही न येण्याचे कारण फोन करून विचारले तर हा प्रेमाचा संकेत समजावा.

Image result for couple pic

५) कामापेक्षा जास्त त्यांना महत्व देणे- जर तुम्ही असे काही करत असाल तर समजून घ्या, तुम्ही प्रेमात आहात. स्वतःचे काम सोडून त्यांचे काम करणे किंवा त्यांच्या कामामध्ये गरज नसताना मदत करणे.
६) जेव्हा कलीगची प्रत्येक गोष्ट चांगली वाटू लागते- त्यांनी ऑफिसमध्ये एखादी नवीन कल्पना सुचवली असेल आणि भलेही ती कल्पना खूप चांगली नसेल तरीही तुम्ही त्यांचे कौतुक करणे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहमती दर्शवणे हा प्रेमात पडण्याचा संकेत समजावा.
७) कलीगच्या बाबतीत सर्वकाही जाणून घेण्याची तीव्र इच्छा- जर ऑफिसमध्ये तुम्हाला कोणी आवडू लागले तर त्याच्याबद्दल सर्वकाही जाणून घेण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होते. ती कोठे राहते, तिची आवड-नावड इ गोष्टी.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *