‘सास भी कभी बहू थी’ मालिकेतील या अभिनेत्याने कमी केले चक्क 96 किलो वजन

kyunki saas bhi kabhi bahu thi

मुंबई: अभिनेता म्हटलं नेहमीच आपल्या डोक्यात येतो ती हॅन्डसम आणि फिट, सिक्स अ‍ॅब्स असलेली व्यक्ती. मात्र इंडस्ट्रीमध्ये असाही एक अभिनेता आहे ज्यानं 96 किलो वजन असतानाही प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानं त्याच्या लठ्ठपणालाही चार्मिंग कसं बनवलं हे त्यालाच माहीत पण आता मात्र या अभिनेत्यानं त्याचं वजन खूप कमी केलं आहे. हा अभिनेता म्हणजे ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतील राम कपूर. रामनं नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. जे पाहिल्यानंतर त्याचे सर्व चाहते चकित झाले. सुरुवातीला तर हा राम कपूर आहे यावर कोणाचा विश्वासच बसला नाही. कारण रामचं सुरुवातीचं वजन 96 किलो होतं मात्र आता राम पूर्णपणे वेगळा दिसत आहे.

View this post on Instagram

Wassssup peeps!! Long time no see

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

 

राम कपूरनं त्याचा लेटेस्ट फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राम कपूरचं अगोदरचं वजन पाहता त्याच्या आत्ताच्या फोटोंवर विश्वास ठेवणं त्याच्या चाहत्यांना कठिण जात आहे. 96 किलो वजन असतानाही राम खूप चार्मिंग दिसत असे मात्र आत्ताच्या लुकमध्ये तो आणखीनच हॅन्डसम दिसत आहे. रामच्या या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये त्याची पत्नी गौतमीचा हात असल्याचं बोललं जात आहे. गौतमी फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरुक असून तिनंच रामला त्याचं वजन कमी करण्यासाठी प्रेरित केलं असल्याचं म्हटलं जात आहे.

View this post on Instagram

Shoppin for shades !!!

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

 

रामच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नजर टाकल्यास तो त्याच्या फिटनेसवर सध्या खूपच लक्ष देत असल्याचं दिसून येतं. रामनं त्याच्या इन्स्टाग्रामवर अनेक जिम व्हिडिओ आणि सेल्फी शेअर केले आहेत.

 

रामनं आता पर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. ज्यात ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कसम से’, ‘बड़े अच्छे लगते हैं’ यांचा समावेश आहे. याशिवाय त्यानं ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’, ‘हमशकल्स’ आणि ‘लवरात्रि’ यासारख्या सिनेमांमध्येही काम केलं आहे. टीव्ही वरील त्याच्या बेस्ट परफॉर्मन्ससाठी त्याला अनेक अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत.

View this post on Instagram

Great drinks great food great ambiance…. thalassa goa

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *