मराठी तितुका मेळवावा, शिवसेनेचे नवनिर्वाचीत खासदार मराठीतून घेणार शपथ

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर ३० मे रोजी म्हणजे गुरुवारी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडणार आहे. यावेळी शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून शपथ घेणार आहेत. कल्याणचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत प्रथमच मतदारांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून शपथ घेणार असल्याची माहिती दिली.

Image result for श्रीकांत शिंदे

शिवसेना ही मराठी अस्मितेवर चालणारी संघटना असून शिवसेनेने नेहमीच मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी लढा दिला आहे असं यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘गेल्या दहा वर्षापासून शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे अशा अभिमानास्पद भाषेतूनच आम्ही खासदारकीची शपथ घेणार आहोत’.

Related image

दरम्यान सोशल मीडियावर #मराठीतशपथ अशा हॅशटॅग ट्रेण्ड होत असून महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी अशी मागणी होत आहे. शपथ घेताना खासदारांना भाषेचा पर्याय असतो. आपल्या मातृभाषेत शपथ घेण्याचा पर्याय खासदारांना दिला जातो. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या शपथविधीत महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार कोणत्या भाषेत शपथ घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *