वच्छीचा अफलातून डान्स ; ‘रात्रीस खेळ चाले २’

Image result for ‘रात्रीस खेळ चाले २’मधल्या वच्छीचा अफलातून डान्स अन् त्यामागची कहाणी

गूढ, थरारपूर्ण अशी ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे. त्यापैकीच एक भूमिका म्हणजे वच्छी. अभिनेत्री संजीवनी पाटील ही भूमिका साकारत आहे.

 image by sanjivani7339 (@sanjivani7339) with caption : "# vacchhi # happy on stage # mazi rangdevata# maza nateshwar# grey shade# 🎭🎭😍❤️" - 2015885443541212264

वच्छीच्या व्यक्तिरेखेसोबतच तिचा डान्सदेखील तितकाच लोकप्रिय आहे. स्वत:च्या मुलाच्या, काशीच्या वरातीत वच्छीचा डान्स सर्व प्रेक्षकांनी पाहिला आणि सगळ्यांना आवडला देखील.

Image result for संजीवनी पाटील

वच्छी या भूमिकेला आणि तिच्या अफलातून डान्सला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला आहे. सोशल मीडियावर डान्सवरून बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले.

पण या डान्समागणी पार्श्वभूमी कोणालाच माहीत नाही. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत संजीवनी पाटील यांनी वच्छीच्या खास डान्समागची कहाणी सांगितली.

Image result for संजीवनी पाटील

कोणत्याही कोरिओग्राफरशिवाय केलेला वरातीतला हा डान्स तुफान हीट ठरला. मालिकेत येत्या काही दिवसांत वच्छीच्या भूमिकेला महत्त्वाचं वळण येणार आहे. कथानकातील हे वळण नेमकं काय असेल हे पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *