दुर्योधन बोलून चूक केली मोदी तर जल्लाद आहेत : राबडी देवी

Image result for ravdi devi

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेतेमंडळी एकमेकांवर ताशेरे ओढत असून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. यादरम्यान बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख (आरजेडी) लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी नरेंद्र मोदींची तुलना जल्लादशी केली आहे.

Image result for priyankagandhi

राबडी देवी यांना पत्रकारांनी जेव्हा प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख दुर्योधन असा केला आहे असं सांगितलं तेव्हा त्यांनी म्हटलं की, ‘प्रियंका गांधी यांनी दुर्योधन म्हणत चूक केली आहे, ते जल्लाद आहेत जल्लाद’.

Image result for ravdi devi

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, राबडी देवी यांनी म्हटलं की, ‘प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख दुर्योधन असा करत चूक केली आहे. त्यांना दुसरी भाषा बोलायला हवी. ते सगळे जल्लाद आहेत. जे न्यायाधीशांची हत्या करतात, त्यांचं अपहरण करतात. अशा व्यक्तीचे विचार किती क्रूर असतील’.

Image result for narendra modi

विशेष म्हणजे २०१४ मध्ये लालूप्रसाद यादव यांनीदेखील नरेंद्र मोदींना जल्लाद म्हटलं होतं. नरेंद्र मोदी कुठेही गेले, त्यांनी काहीही केले, तर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की ते जल्लाद, जल्लाद आणि जल्लादच आहेत, या शब्दांत लालूप्रसाद यादव यांनी टीका केली होती.

Image result for ravdi deviकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना दुर्योधनाशी केली होती. “देशाचे लक्ष विचलीत करण्याचे काम सध्या सुरु आहे. देशाने अहंकारी व्यक्तींना कधीही माफ केलेले नाही.

Related image

इतिहास याची साक्ष देतो, दुर्योधनाचा अहंकारही असाच गळून पडला होता”, असे प्रियांका गांधींनी म्हटले होते. प्रियांका गांधी यांच्या या टीकेवर अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील बिशनपूर येथील सभेत प्रत्युत्तर दिले होते.

Image result for ravdi devi

२३ मे रोजी कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन हे समजणार, असे अमित शाह यांनी म्हटले होते. काँग्रेस नेते मोदीजींविषयी अपशब्दांचा वापर करत असून तुम्ही मोदीजींचा अपमान सहन करणार का, असा सवालही अमित शाह यांनी विचारला होता.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *