भाजपची माघार! शहांनी दिले आदेश; शिवसेना मिळणार मुख्यमंत्रीपद

मुंबई – कोणताच पक्ष सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत नसल्यामुळे अखेर मंगळवारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. यात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पण त्यामध्ये अजून किमान समान कार्यक्रम आणि पदांचे वाटप निश्चित झालेले नाही. त्यातच आम्हाला कोणतीही गडबड नसल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निश्चित केले आहे.

Image result for AMIT SHAH WITH UDHAV

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी सक्रीय होताच, आता भाजपकडूनही सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. १०५ जागांवर विजय मिळवूनही जर विरोधात बसण्याची वेळी भाजपवर येवू नये यासाठी भाजपनेते सक्रीय झाले आहेत. भाजपकडून शिवसेना नेत्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासोबतच, सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना ४० आमदारांची गरज आहे. विधानसभेत २९ आमदार अपक्ष आहेत. त्यांचा पाठिंबा मिळवण्यासह इतर पक्षातील आमदार फोडण्यासाठीही भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान आता भाजपच्या तुलनेत महाशीवआघाडी सत्ता तयार करण्यास जास्त सक्रीय असल्याचे सांगितले जात आहे.

Related image

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *