हाॅस्पीटलमधून बाहेर पडताच संजय राऊतांनी केला मोठा धमाका, दिल्लाला जाण्याची शक्यता

Image result for sanjay Raut

गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती बरी नसतानाही संजय राऊत यांनी रुग्णालयातून ट्विट करत शिवसेनेनं हार मानली नसल्याचे संकेत दिले होते. अँजिओप्लास्टीच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शिनसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज (ता. 13) डिस्चार्ज देण्यात आला. रूग्णालयातून बाहेर पडतानाही राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. तसेच आज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका होणार आहेत. त्यामुळे पुन्हा सत्तासमीकरणे बदलतात का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Image result for sanjay Raut

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरलेल्या शिवसेनेची बाजू खासदार संजय राऊत जोमानं मांडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच (ता. 11) संजय राऊत यांना रूटीन चेकअपसाठी लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर करण्यात आलेल्या अँजिओग्राफीमध्ये दोन ब्लॉकेज आढळले. त्यामुळे डॉक्टरांनी लगेच अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला. राऊतांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्याच दिवशी राज्यपालांनी शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली होती. पण काही कारणांनी शिवसेना बहुमत सिद्ध करू शकली नाही.

महाराष्ट्र राज्यातील राजकीय पक्ष व नेते –
नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर, गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *