मुंबई – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तरीही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तेचे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेसोबत सत्तावटपावर चर्चा तर झालीच मात्र राष्ट्रवादी काँग्रसेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदारांना महत्वपूर्ण सल्ला दिला आहे.
आमदारांनी आपल्या मतदारसंघातू जाऊन कामाला सुरुवात करावी. अवकाळी पावसात शेतकऱ्याचे नुकसान झाले त्याबाबत त्यांना दिलासा देण्याचे काम करावे. आपण जेथून निवडणूक जिंकली तेथे जाऊन नेत्यांनी आभार दौऱे करावे, अशा सूचना देखील शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि नेत्यांना केल्या आहेत.
महाराष्ट्रात सध्या अस्थिरता आहे. राज्यपालांच्या शिफारसीनंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निवडणुका होणार का, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या मनातही हीच भीती आहे. मात्र निवडणुका आपण होऊ देणार नाहीत, असेच काम करू, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, उद्धव ठाकरे, अमित शाह