शरद पवारांनी ठरवले सत्तेचे समीकरण? अशी असेल मुख्यमंत्री अन् मंत्रीपदाची वाटणी

Image result for uddhav thackeray

मुंबई – मंगळवारी सध्याकाळी राज्यपालांच्या विनंतीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्या नंतर अनेक सत्तासमिकरणे पुढे येत आहेत. यात किमान समान कार्यक्रम ठरवून पुढील पाच वर्षे राज्यात स्थिर सरकार तयार होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

‘सध्या सत्तेच्या विभागणी चा प्रश्न हा आता आमच्यापुढे नाही, मात्र वेगळ्या विचारधारेच्या घटकांशी जुळताना काही किमान समान कार्यक्रमावरच सध्या भर असेल’ असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मात्र, सत्ता विभागणीत ही काही मुद्यांवर चर्चा सुरू आहे. शिवसेनेचा भाजप सोबत जर अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावर वाद होता, तर आघाडीत अडीच वर्षे मुख्यमंत्री व्हयला काय हरकत आहे, अशी चर्चा अलिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु आहे. संभाव्य सरकार पुर्ण पाच वर्षे आपला कार्यकाळ पूर्ण करेल, या दृष्टीने काँग्रेसला ही सत्तेत सहभागी करून घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. महत्वाची खाती देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री, तर पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असे एक समीकरण चर्चेत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री आणि काँग्रेसला महत्वाचे खाते देऊन पाच वर्ष उपमुख्यमंत्री पद देण्याची ही जोरदार चर्चा दुसऱ्या समिकरणात सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते अहमद पटेल, वेणू गोपाल यांच्या पत्रकार परिषदेतला रोख पाहता महाआघाडी आणि शिवसेनेतील चित्र स्पष्ट व्हायला आणखी आठवड्याचा अवधी लागेल असे चित्र आहे.

Image result for sharad pawar

महाराष्ट्र राज्यातील राजकीय पक्ष व नेते –

नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर, गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *