शिवसेनेला दुसरा धक्का! संजय राऊत ICU’त दाखल

Image result for sanjay raut

मुंबई – शिवसेनेचे प्रवक्ते, खासदरा संजय राऊत यांच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्याता आले होते. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळल्यामुळे आता त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे 24 तासांमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यात अपयशी ठरल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे.

Image result for sanjay raut

त्यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. हृदयरोग तज्ज्ञ अजित मेनन हे त्यांच्यावर एंजिओग्राफी करणार आहेत. राऊत यांची स्ट्रेस टेस्ट केल्यानंतर काही वेगळ्या रिडिंग्ज आल्यामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. राऊत यांच्यावर आवश्यक ते उपचार केले जाणार असून फार काळजी करण्यासाठी असे काही नाही अशी माहिती सुनील राऊत यांनी दिली.

Related image

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात निर्माण झालेला पेच, आणि भाजप-शिवसेनेदरम्यान निर्माण झालेला तणाव यात संजय राऊत अथकपणे कार्यरत होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर मोठा ताण होता.

Related image

नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, उद्धव ठाकरे, अमित शाह

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *