शिवसेनेकडे मुख्यमंत्री, राष्ट्रवादीला मिळणार ही महत्वाची खाती…

महाराष्ट्राच्या राजकारणात निकाल लागण्यापासून मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली होती. त्यातच आज शिवसैनिकांचे स्वप्न पुर्ण झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठींबा देऊन राज्यात महाशिवआघाडी ची सत्ता स्थापन होत आहे असे स्पष्ट केले आहे.  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसवण्याचं वचन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतःच राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणार असल्याचं समजतं. राष्ट्रवादी काँग्रेस थेट आणि काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याच्या जोरावर शिवसेनेनं आज सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचीही चर्चा असली, तरी उद्धव ठाकरे यांनाच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींची पसंती आहे. मागे एकदा पत्रकारांना अजित पवारांनी सांगतिले होते की आमदार नसतानाही महत्वाचे पद व्यक्तीला देते आहे.

Image result for udhav thakre

राज्यात शिवसेना सत्तेत येणार आहे, तर बाकीचे पदे कसे वाटप होणार आहे त्यात कसे वाटप असे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात खातेवाटपासंदर्भातही चर्चा झाली असून गृह आणि नगरविकास ही खाती राष्ट्रवादीकडे असावीत, यासाठी पवार आग्रही आहेत. वित्त आणि नियोजन खातं सुभाष देसाई यांच्याकडे सोपवलं जाईल, तर गृहमंत्रिपद जयंत पाटील यांना दिलं जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांना नगरविकास मंत्रालय दिलं जाऊ शकतं.

Image result for udhav thakre and Sharad Pawar

महाराष्ट्र राज्यातील राजकीय पक्ष व नेते –
नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर, गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *