मुंबई – सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेना आमदार एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांनी भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. आम्ही 24 तासांच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्हाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आम्ही राज्यपालांना वेळ वाढवून मागितली आहे. आम्ही लवकच सत्ता स्थापनेचा दावा करणार, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला आहे. मात्र, त्यांच्या प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी वेळ लागत आहे.त्यामुळे राज्यपालांचा आदेश घेऊन आम्ही लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत. त्यांनी वेळ वाढवून दिली नाही, मात्र, लवकरच आम्ही सत्ता स्थापन करणार, असे म्हणून आदित्य ठाकरे यांनी वेळ मारून नेली आहे.
यावेळी शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे, त्यामुळे राजकारणाचे गणितच बदलले आहे.
नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, उद्धव ठाकरे, अमित शाह