BSNL चा नवा स्वस्तात मस्त प्लान, मिळणार ‘हे’ जबरदस्त फायदे

Image result for bsnl

मुंबई : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन ऑफर लाँच करत आहे. कंपनीकडून आता सर्वाधिक वैधता असलेला एक नवीन प्लान लाँच केला जात आहे. या नव्या प्लानची किंमत 997 रुपये आहे. कंपनीच्या या प्लानची स्पर्धा एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि जिओ प्लानच्या किंमतीसोबत होणार आहे. या प्लानसोबत मोफत दोन महिन्यांसाठी आपल्या आवडीची रिंगबॅक टोनही लावण्याची सुविधा दिली जात आहे. कंपनीने दिलेल्या या नव्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह दररोज 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा दिली आहे. प्लानची वैधता 180 दिवसांची दिली आहे. हा प्लान 10 नोव्हेंबरपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या कंपनीने हा प्लान केरळ सर्कलमध्ये सुरु केला आहे. बीएसएनएलचे एकट्या केरळमध्ये 1 कोटीपेक्षा अधिक ग्राहक आहेत.

Image result for bsnl

बीएसएनएलच्या प्लानची स्पर्धा भारतीय एअरटेलच्या 998 रुपयाचा प्लान, वोडाफोन, आयिडया आणि जिओचा 999 रुपयाचा प्लानसोबत होणार आहे. या तिन्ही कंपनीच्या प्लानची वैधता कमीत कमी 90 दिवसांची आहे. एअरटेलच्या 998 रुपयांच्या प्लानची वैधता 336 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 12 जीबीचा डेटा आणि एसएमएसची सुविधा मिळते. तसेच वोडाफोनच्या प्लानची वैधताही 365 दिवसांची आहे. जिओच्या 999 रुपयांच्या प्लानची वैधता 90 दिवसांची आहे. ज्यामध्ये 60 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. दरम्यान, बीएसएनएलच्या या नव्या प्लानमुळे एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि जिओ कंपन्यांना मोठी टक्कर मिळणार आहे. बीएसएनएल एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. गेले काही दिवस कंपनी तोट्यात असून कंपनीकडून अनेक नवनवीन ऑफर ग्राहकांसाठी लाँच केले जात आहेत.

Image result for bsnl

TAGS – नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर, गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ उद्धव ठाकरे अमित शाह

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *