भाजप नेत्याचा अपघात! भरधाव वेगात गाडी पलटली

नवी दिल्ली – भाजप खासदार तीरथ सिंह रावत यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. ते दिल्लीहून डेहरादूनला जात होते. त्यावेळी दिल्ली-हरिद्वीर माहामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात ते भीषण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी दिल्लीवरून ते डेहरादूनला जात होते. समोरून येणाऱ्या गाडीपासून वाचण्यासाठी ड्रायव्हरने आपली गाडी बाजूला केली. मात्र, गाडी वेगात असल्याने ड्रायव्हरचा ताबा सुटला. त्यामुळे हा अपघात ढाला.

 

अपघातात रावत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हरिद्वार येथील सिटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, त्यांच्यावर उपचार सूरू आहेत. तर डॉक्टरांनी अद्यापही कोणती प्रतिक्रीया दिलेली नाही.

Image result for tirath singh rawat

नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, उद्धव ठाकरे, अमित शाह

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *