महाराष्ट्रात शिवराज्य नाही तर ‘रामराज्य’ येणार, भाजपच्या चाणक्याने टाकली गुगली

Image result for girish mahajan

राज्यात अद्यापही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांच्या सांगण्यावरून कार्यवाहू मुख्ममंत्री म्हणून फडणवीसांकडे राज्याची धुरा देण्यात आली आहे. त्यातच आयोध्या निकालानंतर नाशिकमध्ये अयोध्या निकालाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरती करण्यात आली. मंदिरात जय श्री रामाचा जयघोष यावेळी करण्यात आला. महाजन याप्रसंगी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राज्यात राम राज्यच येणार आहे, थोडा धीर धरा वाट बघा असे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे म्हणाले. ते आज काळाराम मंदिर परिसरात माध्यमांशी संवाद साधत होते.

Related image

सर्वोच्च न्यायालयाने आज आयोध्या जन्मभूमी विवादीत जमीन प्रकरणाचा निकाल दिला आहे. यात विवादीत जमीन ही राम जन्मभूमीच असून बाबरी मशिदीकरिता वेगळी जागा देण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अयोध्या निकाल सगळ्यांसाठी चांगला आहे. कोर्टानं निकालात संतुलन राखलं आहे. सर्वधर्मीयांनी या निकालाचे स्वागत केले आहे. हा निकाल म्हणजे कुणाची हार किंवा जीत नाही, दोन्ही धर्मियांचा निकालात विचार करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून संबोधले जाणारे महाजन निवडणुक निकालानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी राज्यातील सत्तानाट्यावरील परिस्थितीवर बोलले. राज्यात रामराज्यच येणार आहे, थोडी वाट बघा असे सांगून त्यांनी शिवसेनेला चिमटा काढण्याचा प्रयत्न केला.

Image result for girish mahajan

महाराष्ट्र राज्यातील राजकीय पक्ष व नेते –
नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे, वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर, गोपीनाथ मुंडे, गुलाबराव पाटील, राज ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी, काँग्रेस, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *