भाजपचा प्रस्ताव घेऊन ‘हा’ नेता जाणार ‘मातोश्री’वर; 100 टक्के होणार काम?

Image result for uddhav Thackeray and sudhir mungantiwar

मुंबई – भाजप, शिवसेना सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे राज्यातील सत्तेचा तिढा कायम आहे. त्यातच शिवसेनेन आक्रमक भूमिका घेऊन मुख्यमंत्री पद आपल्यालाच मिळावे, असा दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. यावर आता भाजप नेते सुधीर मुंगटीवार यांनी भाष्य केले आहे.

Image result for uddhav Thackeray and sudhir mungantiwar

वाघ कुठलाही असला तरी त्याचे संरक्षण होणारच, असे म्हणून सत्ता वाटपावर लवकच तोडगा निघेल, असा विश्वास असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याच पार्श्वभूमिवर देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठक बोलावली होती. त्यामध्ये शिवसेनेचे काही नेते उपस्थित होते. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर यावेळी चर्चा करण्यात आली. मात्र, शिवसेना भाजपच्या मुख्यमंत्री पदावरही चर्चा झाल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

Image result for uddhav Thackeray and sudhir mungantiwar
शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपावरून दबावाचं राजकारण सुरू असल्यानं महायुतीतला तणाव वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिले. अवकाळी पाऊस आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान या संबंधित विषयावर बैठक असल्यानं शिवसेनेचे नेते बैठकीला उपस्थित राहिल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं.

Image result for uddhav Thackeray and sudhir mungantiwar

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *