विराटनं वाढदिवसाच्या दिवशी त्या प्रकरणाचा केला खुलासा

Related image

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचा आज ३१ वा वाढदिवस आहे. विराट कोहलीने आत्तापर्यंत यशाची अनेक शिखरे पार केली आहेत. त्यांच्या अफलातून खेळीमुळे भारतीयांच्या मनामनात त्याने स्थान मिळवले आहे. भारतातूनच नाही तर जगभरातून विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

विराट आणि अनुष्कादेखील पहिल्यांदा जेव्हा भेटले, तेव्हा त्यांच्यात नक्की काय संवाद घडला याबाबत विराटने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये उत्तर दिले.

२०१३ मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीसाठी हे दोघे पहिल्यांदा भेटले. त्या भेटीबाबत बोलताना विराट म्हणाला,  “अनुष्का जेव्हा शूटिंगसाठी आली, तेव्हा ती हिल्समुळे खूपच उंच दिसत होती. ती हिल्स घालून आल्यावर मी तिला म्हटलं की तू माझ्यापेक्षाही उंच दिसते आहेस. त्यावर तिने मला सांगितलं की मी काही ६ फूट वगैरे उंच नाही. मी हिल्समुळे इतकी उंच दिसते आहे. त्यावर तुला आणखी उंच हिल्सच्या चपला मिळाल्या नाहीत का? असं मी तिला गमतीत म्हटलं. मला वाटलं की ते फारच गमतीशीर आहे, पण खरं तर मी तसं बोलायला नको होतं. कारण त्यानंतर ती थोडी चिडल्यासारखी वाटली, पण मी गमतीत ती गोष्ट बोललो हे मी तिला लगेच सांगितलं.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *