त्यामुळे राणें यांचं राजकीय भवितव्य लागले पणाला…

Image result for नारायण राणे

कणकवली : कणकवली मतदारसंघातकाँटें की टक्करआहे. शिवसेनेचे सतीश सावंत किंवा भाजपचे नीतेश राणे यापैकी कोण निवडुन येणार आणि मताधिक्यावरून कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत. कणकवलीच्या निकालाबाबत मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता असून राणेंचेही राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. कणकवलीत ऐनवेळी शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली. तसेच शिवसेना आणि भाजप दोहोंनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. एवढेच नव्हे तर दोहोंच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे त्यामुळे राणे निवडून येणार की सावंत याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे. भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांची मदार कार्यकर्त्यांच्या भक्कम नेटवर्कवर आहे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी बांधलेल्या संघटनेवर राणे यांनीही आपला पगडा बसवला. तसेच कणकवली मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायती, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर राणे समर्थकांचे वर्चस्व आहे. याच कार्यकर्त्यांच्या पाठबळावर विजयाचा विश्वास राणेंना आहे.

Related image

कणकवली मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असल्याने इथे शिवसेनेची संघटना बांधणी फारशी झाली नाही; मात्र जिल्हा बॅंक आणि या बॅंकेच्या नियंत्रणात येणाऱ्या गावोगावच्या सोसायट्या, पतपेढ्या इतर संस्थांवर शिवसेनेचे उमेदवार सावंत यांचे वर्चस्व आहे. या संस्था आणि त्यामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही सावंत यांच्यासाठी मेहनत घेतल्याने त्यांचे कणकवली मतदारसंघात त्यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. कणकवली मतदारसंघात राणेंची साथ सोडून अनेक कार्यकर्ते सावंत यांच्या पाठीशी राहिले. त्यामुळे गेल्यावेळच्या कुडाळ मतदारसंघातील निकालाची पुनरावृत्ती कणकवलीत होते की काय अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

Related image

त्याची दखल घेत राणे यांनीही गावागावात शेवटच्या दोन दिवसांत जोरदार प्रचार यंत्रणा राबवली. या टप्प्यात तुलनेत सावंत यांच्या कार्यकर्त्यांची ताकद अपुरी ठरल्याचे चित्र होते. मतदानादिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेआण करणे, त्यांच्या चहानाश्त्याची व्यवस्था करणे यामध्येही राणेंचे कार्यकर्ते आघाडीवर राहिलेत्याचाही फायदा या निवडणुकीत राणेंना होईल असा दावा राणेंच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. तर राणेंचे कार्यकर्ते राणेंकडेच ठेवून मतदान मात्र आपल्याला होईल, अशी रणनिती सावंत यांची असल्याने ते निश्चितपणे बाजी मारतील असाही विश्वास सावंत समर्थकांमध्ये आहे. यातून राजकीय निकालाबाबत पैजा लावल्या जात आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *