बँकेच्या कॅबिनमध्येच दोघांचेही चालायचे ते काम; अन्..


मात धोका मिळाल्यानं एका तरुणीने विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथून ही घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार आहे.

Image result for suicide

दरम्यान, तरुणीने दिलेल्या माहितीनुसार सिंडिकेट बँकेत तरुणीचं खात होतं. खात्याचं काम करण्यासाठी तरुणीची बँकेत ये-जा असे. मात्र अलीकडच्या काळात तरुणीचं बँकेत जाणं दिवसेंदिवस वाढू लागलं. बँकेच्या शाखा प्रमुख अजय यादव यांच्यासोबत तरुणीची मैत्री झाली, ज्यामुळे दोघांमध्ये भेटीगाठी वाढू लागल्या आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. याचाच फायदा घेत अजयने तरुणीला लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध देखील ठेवले.

Image result for suicide

आरोपी अजय यादवचं आधीच लग्न झालेलं असताना देखील त्याने तरुणीला खोटी आशा दाखवत तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले. लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा तरुणीला अजय यादवचं लग्न झाल्याचं समजलं त्यावेळी तिला धक्काच बसला. पीडित तरुणीने यासंदर्भात अजय यादवला जाब विचारला असता त्यांच्यात बराच वेळ वाद झाला. त्यानंतर तरुणीनं रागाच्या भरात विष पिऊन आत्महत्या केली.

Related image

घटनेची माहिती मिळताच तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान पीडित तरुणीचा मृत्यू झाला. अशी माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली असून अजय यादवच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कुटुंबियांनी अजयवर लग्नाचं आमिष दाखवून , फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी अजय फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Related image

Tag – पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना,

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *