सई ताम्हणकरने शेअर केला बोल्ड फोटो, फॅन्स म्हणाले…

 

अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.

सई सोशल मीडियावर कधी  हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते तर कधी सोज्वळ. तिने जरा कॅज्युअल अंदाजातला फोटो शेअर केला आहे. या फोटोत सई खूपच कूल लूकमध्ये दिसतेय. व्हाईट कलरच टी शर्ट आणि जीन्स या फोटोत सईने घातले आहे. सईचा हा समर लूक तिच्या फॅन्सनाही आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव फॅन्सनी तिच्या फोटोवर केला आहे.

 

सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती तिने मराठी सोबत हिंदीमध्येही काम केले आहे आणि तिच्या भूमिकांचे देखील तितकेच कौतुक झाले आहे. सईच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

 

लवकरच वैभव तत्त्वादीसोबत ‘पाँडेचेरी’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे. सईचा आगामी चित्रपट कधी भेटीस येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *