‘तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार’, मुनगंटीवारांचा सुचक इशारा

जळगाव – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेत युती होईल असा ठाम विश्वास राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज जळगाव येथे व्यक्त केला केला आहे. ‘तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार…अशा शब्दांत त्यांनी भाजप शिवसेनेतील युतीचे अप्रत्यक्ष संकेत दिले.

Image result for devendra fadnavis sad

रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी गेल्या ५ वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा घेणाऱ्या ‘बांधिलकी’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यासाठी मुनगंटीवार जळगाव येथे आले होते. तसेच रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील सावदा येथे आयोजित बुथ कार्यकर्ता मेळाव्यालाही त्यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांनी युतीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपले मत मांडले.

Related image

विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेत युती होणार म्हणजे होणारच. आमचे प्रेम ‘तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार.. ऐसा भाजप-सेना का प्यार’ असे आहे. या माध्यमातून मला पूर्ण विश्वास आहे की युती होणारच. १९८९ मध्ये आमच्या युतीला सुरुवात झाली. २०१४ चा एक अपवाद वगळता ती कायम आहे. युतीच्या माध्यमातून आमचे विचारांचे प्रेम राज्यातील जनतेने पाहिले आहे. हेच प्रेम २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील युतीच्या माध्यमातून कायम असेल, असे त्यांनी सांगितले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *