विश्वविक्रम! भारतासह बलाढ्य संघांना जमलं नाही, ते अफगाणिस्ताननं करुन दाखवलं

ढाका – सध्या बांगलादेशमध्ये तिरंगी टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेत मीरपूर येथे झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने यजमान बांगलादेशचा २५ धावांनी पराभव केला. या विजयासह अफगाणिस्तान संघाने विश्वविक्रम केला आहे. अफगाणिस्तानच्या संघाने सलग १२ टी-२० सामने जिंकण्याची किमया केली आहे. या आधी सलग ११ सामने जिंकण्याचा विश्वविक्रमही त्यांच्याच नावावर होता.

अफगाणिस्ताननंतर पाकिस्तानने सलग ९ सामने जिंकले आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज अशा बलाढ्य संघांनाही हा पराक्रम करणे शक्य झालेले नाही. मात्र, अफगाणिस्तानने हा कारनामा केला आहे. तसेच, आशिया खंडात खेळण्यात आलेल्या २१ सामन्यांपैकी सर्व सामने जिंकल्याचाही विक्रम अफगाणिस्तानच्या नावे आहे.

दरम्यान, अफगाणिस्ताने तिरंगी मालिकेत बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून गुणतक्त्यात पहिले स्थान पक्के केले आहे. अफगाणिस्तानने दोन सामन्यात दोन विजयांसह ८ गुण मिळवले आहेत. तर बांगलादेशने एक विजय आणि एक पराभवासह ४ गुण पटकावले आहेत. झिम्बाब्वेला आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *