तृणमूल अध्यक्षा ममता बॅनर्जींना होणार अटक?

Image result for Mamata Banerjee

नवी दिल्ली – काश्मीरमधील आवाज दाबण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बळाचा वापर करत आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. सरकारविरोधात आवाज उठवल्याबद्दल मला अटक करा, असे आव्हान त्यांनी यावेळी केले. तृणमूल काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या तृणमूल छात्र परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित एका सभेत त्या बोलत होत्या.

Image result for Mamata Banerjee

रिझर्व्ह बँकेने सरकारला 1.76 लाख कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरूनही ममतांनी केंद्रावर टीका केली. महत्त्वाच्या संस्था माजी नोकरशहा चालवत असून, ते सरकारचे हुजरे म्हणून काम करत आहेत, असे ममता म्हणाल्या. ‘काश्मीरमध्ये काय सुरू आहे? विरोधातील सर्व आवाज दाबवण्यासाठी सरकार काश्मीर खोऱ्यात बळाचा वापर करत आहे,’ असेही ममता म्हणाल्या.

Image result for Mamata Banerjee
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकाला संसदेमध्ये विरोध केला होता. तर मतदानाच्या वेळी सभात्याग केला होता. सर्वपक्षीय बैठक झाली असती, तर आपण आपले मत मांडले असते, असेही त्यांनी यावेळी म्हटले. फारूख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि ओमर उब्दुल्लाह सध्या कोठे आहेत हे कुणालाच ठाऊक नाही. सरकारविरोधात आपण सतत आवाज उचलणार आहोत. त्यासाठी सरकारने आपल्याला अटक करावी, असे आव्हानही त्यांनी सभेत केले.

Related image

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *