‘नो मेकअप लूक’मध्ये दीपिका पादुकोणचे फोटो व्हायरल…

Deepika Padukone aces no-makeup look in latest magazine

काही दिवसांपूर्वीच दीपिका पदुकोणने “छपाक’ या आपल्या पुढच्या सिनेमाचे शुटिंग सुरू केले होते. या सिनेमात दीपिका ऍसिड हल्ल्यातील पीडीत मुलीचा रोल करते आहे. अलीकडे तिचा लुक खूपच हटके असल्याने त्यासाठी मेकअप आर्टिस्टना खूपच कष्ट घ्यायला लागतात. तब्बल  दीपिकाच्या मेकअपसाठी दरवेळी किमान 3 ते 4 तासांचा अवधी लागतो.

बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण सध्या ‘छपाक’ या सिनेमात बिझी आहे. याचदरम्यान दीपिकाने जगप्रसिद्ध वोग इंडिया मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले. तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या ग्लॅमरस फोटोशूटमध्ये दीपिका ‘नो मेकअप लूक’मध्ये दिसतेय.

अशा अनेक चर्चा छपाक या चित्रपटतील लूकमुळे सोशल माध्यमांमध्ये सुरु होत्या. मात्र आता सोशल माध्यमांमध्ये नो मेकअप लुकमुळे  तिचे फोटोला युजर्सकडून चांगलीच दाद मिळाली आहे.

वोग इंडियाच्या या अंकात केवळ दीपिकाचे ग्लॅमरस फोटोशूट नाही तर दीपिकाने दिलेल्या अनफिल्टर्ड प्रश्नांची उत्तरे सुद्धा आहेत. वोगचा ऑगस्टचा कव्हर फोटो खुद्ध दीपिकानेही   तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.  बेअरफेस अ‍ॅण्ड अनफिल्टर्ड, असे कॅप्शन तिने दिलेय.

छपाकच्या शूटिंगदरम्यान दीपिकाने  जगप्रसिद्ध वोग इंडिया मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले. तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या ग्लॅमरस फोटोशूटमध्ये दीपिका ‘नो मेकअप लूक’मध्ये दिसतेय.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *