शिल्पा देत होती पोज अचानक उडाला ड्रेस, व्हिडीओ व्हायरल

Shilpa Shetty

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या यूरोपमध्ये आहे. आपल्या कुटुंबियांसोबत ती तिथं सुट्ट्या एन्जॉय करत आहे. शिल्पानं आपल्या व्हॅकेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. जिथं शिल्पा शेट्टी खूप रिलॅक्स आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसतेय. विशेष गोष्ट म्हणजे शिल्पा शेट्टी आपल्या रोजच्या नियमाप्रमाणेच या ट्रिपमध्ये सुद्धा आपल्याला एक्सरसाईज आणि डाएट करतांना दिसतेय. तिनं व्यायाम करतांनाचे व्हिडिओ सुद्धा शेअर केले होते.

 

नुकताच शिल्पानं आपल्या यूरोप ट्रिपमधील एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी क्रूजवर खूप रिलॅक्स दिसतेय. या व्हिडिओमध्ये शिल्पा क्रूजवर मोकळ्या आकाशाखाली खास पोज देत आहे. मात्र तेव्हा तिचा ड्रेस हवेमुळे उडू लागतो. तेव्हा तिनं आपला ड्रेस सावरत अजून वेगळ्या पोज दिल्या आहेत. शिल्पा शेट्टीनं स्वत: तिचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत शिल्पानं लिहिलं, ‘ही क्रूजवरची माझी मर्लिन मुनरो मोमेंट आहे.’ हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पाहा, आपल्याला कळेल की शिल्पा असं का म्हणतेय ते…

यापूर्वीही शिल्पानं सोशल मीडियावर आपले अनेक फोटो शेअर केले होते. यात ती यूरोपमध्ये क्वॉलिटी टाईम स्पेंड करतांना दिसतेय. अभिनेत्री नेहमी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढत आपल्या कुटुंबियांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत असते. शिल्पा शेट्टीनं काही दिवसांपूर्वीच टीव्हीवरील रिअॅलिटी शो सुपर डांसरच्या ३ सिझनचं शूटिंग संपवलं आहे. यानंतर ती आपल्या फॅमिलीसोबत यूरोपला व्हॅकेशनसाठी गेली. आपल्या सुट्ट्यांचे खास व्हिडिओ आणि फोटो शिल्पा शेअर करत आहे.

View this post on Instagram

Yayyyyy!!! Have super exciting news for you all instafam. After the overwhelming response to my app launch, we are still topping the health and fitness charts at No 1💪🧘🏾‍♂ To show my gratitude, ALL YOGA and EXERCISE sections, along with the recipes are now available for FREE… limited period only. So what are you waiting for? Start your fitness journey NOW with the Shilpa Shetty App, available exclusively on the App Store (Link in Bio). It will be available to Android users from June onwards. Sending all my love from Koh Samui. With Gratitude SSK #SwasthRahoMastRaho #shilpashettyapp #free #mothersdaygift #fitness #gifthealth #awareness #healthmotivation #wellness #breathe #yoga #yogi #mind #body #soul #gratitude #love #start #No1

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

 

प्रोफेशनल लाईफसोबतच शिल्पा सोशल मीडियावर पण खूप बिझी असते. ती नेहमीच आपले व्हिडिओ आणि फोटो सोशल साईट्सवर पोस्ट करत असते. तसंच शिल्पा तिच्या एक्सरसाईजचं रूटीन आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. शिल्पा शेट्टी ४४ वर्षांच्या वयातही खूप हॉट आणि फिट दिसते. तिच्या या फिटनेसचं रहस्य ती व्यायामासोबतच योग असल्याचं सांगते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *