तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर झडकणार ‘ही’ झीरो फिगर हिरोईन

Related image

शिल्पा शेट्टी खूप मोठ्या काळापासून सिल्वर स्क्रीनवरून गायब आहे. आता असे ऐकण्यात आले आहे की, ती 12 वर्षांच्या मोठ्या विश्रांतीनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शिल्पा लवकरच अभिनेता-सिंगर दिलजीत दोसांझ आणि यामी गौतम स्टारर चित्रपटात महत्वपूर्ण रोल सकाकारणार आहे.

 

अजीज मिर्जाचा मुलगा करणार आहे दिग्दर्शन…
मुंबई मिररच्या एका रिपोर्टनुसार, शिल्पा चित्रपटात रायटरच्या भूमिकेत दिसणार आहे आणि चित्रपट तिच्याच दृष्टिकोनातून दाखवला जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रमेश तौरानी करत आहे. तसेच अजीज मिर्जा यांचा मोठा मुलगा हारून मिर्जा या चित्रपटाद्वारे दिगदर्शनात पॉल टाकणार आहे. हारूनने शाहरुख खान स्टारर चित्रपट ‘राजू बन गया जेंटलमॅन, ‘यस बॉस’ आणि ‘पहेली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टरचे काम केले आहे.

 

 

ऑगस्टमध्ये शूटिंग सुरु करणार आहे शिल्पा…
शिल्पा यावेळी लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ती मुंबईला परतणार आहे. सुट्यांवरून परतल्यावर ती चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे. अनेक दिवसांपासून अभिनेत्रीला केवळ रियलिटी टीव्ही शोज मध्ये जज म्हणून पहिले जात आहे. तसेच ती सध्या आपले फिटनेस एप आणि ऑलाइन कुकरी शोमध्येही खूप व्यस्त आहे. मोठ्या पडद्यावर तिला पुन्हा पाहून सर्वांचं छान वाटेल.

 

नीरज वोराने लिहिली आहे कथा…
चित्रपट एका कपलच्या अवतीभोवती फिरणारा आहे. याची कथा नीरज वोराने लिहिली आहे. यादरम्यान विभा सिंह आणि अरशद सय्यैदने तिला असिस्ट केले होते. ही त्यांची शेवटची स्क्रिप्ट होती. 2017 मध्ये टीकाचे निधन झाले होते.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *