‘नत्थुराम गोडसेचा जन्म बारामतीत झाला’; त्यांच्या या विधानानं अजित पवारांची दातखीळीच बसली

Image result for Ajit Pawar In tension

मुंबई: ” महात्मा गांधी यांच्या जयंतीचे 150 वे वर्ष सुरु असल्याच्या निमित्त अर्थसंकल्पात 150 कोटी का ठेवले ? या पैशांचा विनियोग कसा करणार ?असा प्रश्न विरोधकांसह अजित पवार यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सभागृहात विचारला.

Image result for Ajit Pawar In tension

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थसंकल्पातील तरतुदीबाबत विषय सुरु असताना हा मुद्दा उपस्थित केला . त्यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनीही हा प्रश्न लावून धरला . तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी विचाराची पाठराखण करीत असताना तुम्ही या पैशातून महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार करणार का ? हे काम कोण करणार आणि कसे करणार याचाही तपशील मिळायला हवा . याबाबत तुमच्या योजना काय आहेत? की केवळ दाखवण्यापुरतीच ही तरतूद आहे ? असा प्रश्न या दोघांनी लावून धरला .

Image result for Mungantiwar

या चर्चेत सहभागी होताना अजित पवार म्हणाले, ” नथुराम गोडसे याचे पुतळे उभारण्याची भाषा करणाऱ्या संघटना तुमच्या बरोबर आहेत . नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणारे खासदार तुमच्या पक्षात आहेत . महात्मा गांधी यांची नथुराम गोडसेने हत्या केली त्याचेही समर्थन करून नथुरामचे पुतळे उभारणारे तुम्हाला जवळचे की महात्मा गांधी जवळचे ?

Image result for Mungantiwar
विरोधकांसोबत अजित पवार नथुराम गोडसेच्या विषयावर बोलताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अजित पवारांना म्हणाले, नथुराम गोडसेचा जन्म बारामतीला झाला.
त्यावर अजित पवार यांनी ही गोष्ट आम्हाला प्रथमच कळत असल्याचे सांगितले. त्यानंतर या विषयावरील चर्चा थांबली .

Image result for Mungantiwar

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *