वायू चक्रिवादळ: स्काय वॉल्कचा भाग कोसळून तीन महिला गंभीर

Three women injured in collapse of Sky Walk's acrylic Sheet | स्काय वॉल्कचा भाग कोसळून तीन महिला जखमी 

मुंबई – बांद्रा पश्चिम येथील एस व्ही रोड येथील स्काय वॉकच्या अ‍ॅक्रॅलिक शीट खाली कोसळून अपघात असून या दुर्घटनेत तीन महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत  आहे. या घटनेनंतर जखमी महिलांना नजीकच्या हॉली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या तिघांची देखील प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Image result for mumbai cyclone

मुंबईत वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे स्कायवॉकला लावण्यात आलेली पत्र्याची शेड निखळून खाली चालत असलेल्या दोन पाडचाऱ्यांवर पडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मालिसा नजरात (30) , सुलक्षणा वझे (41) , तेजल कदम (27) अशी जखमी महिलांची नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Image result for mumbai cyclone

ही दुर्घटना आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेची वाहतूक पोलिसांनी दखल घेत उपचारासाठी तिघांनाही रुग्णालयात दाखल केले आहे. आज दिवसभरातील ही दुसरी घटना असून आज दुपारी चर्चगेट येथे होर्डिंगचा भाग कोसळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *