अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील 2,100 शेतकऱ्यांचे कर्ज फेडले

Image result for amitabh bachchan farmersबॉलिवूड शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील दोन हजारहून जास्त शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं आहे. स्वत: अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, ‘माझं आश्वासन पूर्ण केलं आहे. बिहारमध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकबाकी होती, त्यांच्यातील २१०० जणांची निवड करण्यात आली आणि ओटीएसच्या (वन टाइम सेटलमेंट) माध्यमातून त्यांची सर्व थकबाकी फेडण्यात आली आहे’.

अमिताभ बच्चन यांनी शेतकऱ्यांपैकी काहीजणांना जनक येथे बोलावलं होतं. तिथे मुलगी श्वेता आणि अभिषेकच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्रं देण्यात आली. जनक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं नाव आहे. याआधी अमिताभ बच्चन यांनी लिहिलं होतं की, ‘कर्जाची रक्कम परत करण्यात असमर्थ असणाऱ्यांसाठी एक गिफ्ट आहे. ते बिहार राज्यातील असतील’.

Image result for amitabh bachchan farmersअमिताभ बच्चन यांनी शेतकऱ्यांची मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गतवर्षी त्यांनी उत्तर प्रदेशातील तीन हजाराहून जास्त शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं होतं. याशिवाय अमिताब बच्चन यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंब आणि पत्नींना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *