खेळाडू केदार जाधवच्या दुखापतीबाबत वेट अँड वॉच भूमिका: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताच्या वर्ल्ड कप संघातील महत्त्वाचा खेळाडू केदार जाधवच्या दुखापतीबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करताना केदारला दुखापत झाली होती. केदारच्या तंदुरुस्तीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात किंवा भारतीय संघ लंडनसाठी रवाना होईल त्याच्या आदल्या दिवशी घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे केदारचं वर्ल्ड कप तिकीट अजून वेटिंगवरच आहे. केदारला रिप्लेसमेंट म्हणून दोन खेळाडूंना तयार राहायला सांगितले आहे.

च्या माहितीनुसार बीसीसीआय केदारच्या तंदुरुस्तीवर बारीक लक्ष ठेवून आहे. केदार वर्ल्ड कपला जाणार की नाही, यावर आता भाष्य करणे घाईचे ठरेल. तो तंदुरुस्त होईल की नाही, हेही आता सांगू शकत नाही. मात्र, पुढील आठवड्यात किंवा लंडनला रवाना होण्यापूर्वी त्याच्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. भारतीय संघात 23 मे पर्यंत बदल करता येऊ शकतो. केदारला रिप्लेसमेंट म्हणून अंबाती रायुडू व अक्षर पटेल यांना तयार राहायला सांगितले आहे.

One thought on “खेळाडू केदार जाधवच्या दुखापतीबाबत वेट अँड वॉच भूमिका: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *